सारथी विषयी

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था कंपनी कायदा, 2013 अंतर्गत कलम 8 अन्वये नॉन-प्रॉफिट सरकारी कंपनी म्हणून स्थापन आहे. सारथीची स्थापना मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी समुदाय आणि महाराष्ट्रातील कृषीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी आणि आमच्या संस्थेमध्ये जोरदार क्षेत्रांचा समावेश आहे, संशोधन, सरकारची धोरणे, प्रशिक्षण इ. आणि ग्रामीण जनतेस मार्गदर्शन, विशेषत: जे शेतकरी शेतीवर अवलंबून असतात त्यांच्यासाठी मार्गदर्शन करणे.

Shahu_Maharaj_Sarthi सारथी संस्थेच्या नामकरणाच्या निमत्ताने

राजर्षी शाहूंचे नाव ह्या संस्थेसाठी समर्पक व औचित्यपूर्ण आहे. भारत शेतकऱ्यांचा देश आहे. सिंधू संस्कृतीपासून आजपर्यंत येथील शेतकऱ्यांनी आपली महान भारतीय संस्कृती घडवली आहे, जोपासली आहे. प्राचीन प्रजावत्सल राजे व आधुनिक समाजसुधारकांच्या परपंरांना जोडणारी कडी म्हणजे राजर्षी शाहू महाराज.

शेतकरीच नाही तर लहान-मोठ्या प्रत्येक समाजाची काळजी घेणारे व त्यासाठी अनेक लोककल्याणकारी धोरणे ठरवणारे, संस्थानात तसे कायदे करणारे राजर्षी शाहू एक आगळेवेगळे युगपुरुष होते. म्हणूनच डॉ. बाबासाहबे आंबेडकरांनी त्यांना सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ म्हटले आहे.

राजर्षी शाहू स्वराज्याचा खरा पाया घालणारे सत्यशोधक होते ही जाणीव महात्मा गांधींनी व्यक्त केली. गांधीजी म्हणतात, “सत्यशोधक समाजाच्या तत्वांप्रमाणे छत्रपती शाहू महाराज यांनी अस्पृश्यता नष्ट केली. हा त्यांनी स्वराज्याचा पायाच घातला आहे.”

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या मराठी भूमीत रयतेच्या कल्याणासाठी शिवरायांइतकाच दक्ष राजा कोण असा विचार केल्यास प्रथम छत्रपती शाहू महाराजांचे नाव समोर येते. शिवरायांचे प्रखर राष्ट्रप्रेम, जनतेचा खरा कळवळा, न्यायप्रियता, निभर्य कायर्क्षमता या गुणांनी संपन्न छत्रपती शाहूनी त्या काळात शिक्षणाचे महत्त्व ओळखले व त्याबरोबरच राष्ट्राच्या विकासासाठीच नव्हे तर मानवतेच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारचा जातीयवाद किती विषारी आहे हे ही ओळखले. राजर्षी शाहू म्हणत असत, “जातिभेद देशोन्नतीच्या मार्गात हा अडथळा आहे, जातिभेद नाहीसा होण्यावर देशाची प्रगती अवलंबून आहे.” “जातिभेद मोडून आपण सर्व एक होऊ या. प्रेमाने प्रेम वाढते व द्वेषाने द्वेष वाढतो.”

शिक्षणाचे महत्व जाणणारा, शेतकरी हितासाठी दक्ष, दलित व इतर मागासवगीर्यांसाठी क्रांतीकारी पाऊले उचलणारा ह्या राजर्षीच्या नावाने स्थापलेली सारथी ही संस्था त्यांच्या कायार्ला पुढे नेण्यासाठी कटीबद्ध आहे.

प्रथम संचालक व संस्थेच्या सदस्य यांची नियुक्ती तसेच संघटनेचा लेख (Articles of Association) व संघटनेचा मसुदा (Memorandum of Association): पहा

संचालक मंडळ जी.आर.(GR of Board of Directors): पहा