Shivaji Maharaj
shapes
shapes

परिचय आणि लोगोचे महत्त्व

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही महाराष्ट्र शासनाची नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील दिनांक 25 जून, 2018 रोजी कंपनी कायदा 2013 च्या कलम 8 अन्वये स्थापन करण्यात आलेली नॉन-प्रॉफिट कंपनी आहे. महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा - कुणबी व कुणबी -मराठा या लक्षित गटातील समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाकरिता या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा - कुणबी व कुणबी - मराठा या लक्षित गटातील समाजाची सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी विविध सर्वेक्षण घेऊन कृती संशोधनाआधारे विविध कार्यक्रमांचे नियोजन व आखणी करणे. संस्थेच्या स्थापनेमागील उद्दिष्टांचा विचार करता लक्षित गटाला सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी संशोधन करून माहितीचे संकलन व पृथ्थकरण करणारी “शिखर संस्था” म्हणून सारथी संस्था कार्यरत आहे. लक्षित गटाच्या समाजातील विविध समस्यावर जाणीव जागृती करून विशेष व पथदर्शी प्रकल्प वेळोवेळी हाती घेण्यात येत आहेत. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीच्या रजिस्ट्रार ऑफ कंपनी (Registrar of Companies) कडून मंजूर केले नुसार पदसिद्ध सदस्य आठ आहेत त्यामध्ये विविध विभागांच्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मंजूर केलेनुसार पदसिध्द सदस्य खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. पदनाम

1

प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई

2

सचिव, कृषि  विभाग,मंत्रालय,मुंबई

3

अपर मुख्य सचिव, उद्योग,ऊर्जा व कामगार विभाग(उद्योग),मंत्रालय,मुंबई

4

सचिव, आदिवासी विकास विभाग,मंत्रालय, मुंबई

5

अपर मुख्य सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,(सामाजिक न्याय) मंत्रालय,मुंबई

6

सचिव, इतर मागास, बहूजन कल्याण विभाग, मंत्रालय,मुंबई

7

प्रधान सचिव, उद्योग,ऊर्जा व कामगार विभाग (कामगार) मंत्रालय,मुंबई

8

प्रधान सचिव, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग,मंत्रालय,मुंबई

तसेच दिनांक 15 ऑक्टोबर 2020 अन्वये संस्थेच्या संचालक मंडळाची संरचना करण्यात आली असून यामध्ये एकूण बारा सदस्यांचा समावेश असून निवृत्त सनदी अधिकारी, विविध विभागांचे आयुक्त व व्यवस्थापकीय संचालक सारथी यांचा समावेश आहे. मुख्य उद्दिष्टांसोबत इतर पूरक बँक उद्दिष्टांचा समावेश याकरिता केला असून - * कृषी विभाग * शिक्षण विभाग * स्पर्धा परीक्षा विभाग * संशोधन विभाग * लेखा व परीक्षा विभाग * ग्रंथालय व प्रकाशन विभाग कौशल्य विकास विभाग * समाज कल्याण विभाग सांख्यिक विभाग * पायाभूत सुविधा विभाग मानव संसाधन विभाग पर्यटन व सांस्कृतिक विभाग या विविध विभागांच्या मार्फत ही मुख्य 3व 82पूरक उद्दिष्टांची फलश्रुती होण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील मराठा कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा लक्ष गटातील समाजाच्या सामाजिक व आर्थिक व शैक्षणिक विकासाकरिता विविध योजना उपक्रम राबवण्यात येत आहेत.
चिन्ह विवरण
झाडाचे पान……………. कृषि विकास
यंत्राचे चाक…………….. तंत्रज्ञान
उघडलेले पुस्तक……..

शिक्षण

आकाशाकडे झेप…… प्रगतीकडे वाटचाल करणारे युवक
लेखणी…………………… पुरोगामी व सुसंस्कारीत विचारांची मांडणी
संतांचे आचार व विचार